खुर्चीचा अंदाज चुकला आणि BJP खासदार चारचौघात आपटले; व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

खुर्चीचा अंदाज फसल्यामुळे रवी किशन हे जमीनीवर कोसळल्याचे पाहायला मिळाले. खुर्ची थोडी मागे आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे ते खाली पडले. सुदैवाने यात त्यांना कोणतही दुखापत झाली नाही.  

 गोरखपुर: भारतीय जनता पक्षाचे खासदार रवी किशन सध्या मतदार संघात चांगलेच सक्रिय आहेत. उत्तर भारतात लोकप्रिय असलेल्या छठ पूजेवेळी त्यांनी विविध भागातील घाटावर जाऊन परिस्थितीचे निरीक्षणही केले. दिवसातून त्यांनी सात आठ कार्यक्रमाला हजेरी लावली. एका कार्यक्रमात ते चक्क खुर्चीवर बसताना थेट जमिनीवर कोसळल्याचे पाहायाला मिळाले. शुक्रवारी त्यांच्यासोबत घडलेला प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

मोहद्दीपुर येथील हायडिल कॉलनीत आयजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. याठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर हार-तूरे देऊन स्वागत झाल्यानंतर आसनस्थ होताना त्यांच्यासोबत विचित्र प्रकार घडला. खुर्चीचा अंदाज फसल्यामुळे रवी किशन हे जमीनीवर कोसळल्याचे पाहायला मिळाले. खुर्ची थोडी मागे आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे ते खाली पडले. सुदैवाने यात त्यांना कोणतही दुखापत झाली नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gorakhpur bjp mp ravi kishan fell down from chair while participating program watch video