Gorakhpur Lok Sabha Election Result: गोरखपूरमध्ये अभिनेता विरुद्ध अभिनेत्री; रवी किशन की काजल निषाद, कोण मारणार बाजी?

Gorakhpur Constituency Lok Sabha Election Result: अभिनेता विरुद्ध अभिनेत्री अशी लढत गोरखपूरमध्ये बघायला मिळणार आहे.
 गोरखपूरमध्ये अभिनेता विरुद्ध अभिनेत्री; रवी किशन की काजल निषाद,  कोण मारणार बाजी?
Gorakhpur Constituency Lok Sabha Election Resultsakal

Gorakhpur Constituency Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी पार पडलं. आता उद्या (4 जून) लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. अशातच उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोरखपूर (Gorakhpur) येथील लोकसभा निवडणुकीची लढत देखील चुरशीची आहे. यावेळी अभिनेता विरुद्ध अभिनेत्री अशी लढत गोरखपूरमध्ये बघायला मिळणार आहे. गोरखपूरमध्ये भाजपने आपले विद्यमान खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर काजल निषाद (Kajal Nishad) या समाजवादी पक्षामधून निवडणूक लढवत आहेत. अशातच आता रवी किशन आणि काजल निषाद या दोघांपैकी विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

गोरखपूरमध्ये दबदबा कुणाचा?

गोरखपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजपचा दबदबा पहायला मिळत आहे. गोरखपूर योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1998 ते 2017 पर्यंत सलग 5 वेळा गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत.

2019 च्या निवडणुकीचा निकाल

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप अभिनेता रवी किशन (रवींद्र शुक्ला) गोरखपूर मतदारसंघातून विजयी झाले, त्यांना 7,17,122 मते मिळाली. तर सपाचे राम निषाद यांना 4,15,458 मते मिळाली आणि काँग्रेसचे मधुसूदन त्रिपाठी यांना केवळ 22,972 मते मिळाली.

कोण आहे काजल निषाद?

काजल निषाद या भोजपूरी अभिनेत्री आहेत. काजल यांनी लपतगंज या कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी शादी बियाह या भोजपूरी चित्रपटात देखील काम केलं आहे. आता काजल या रवी किशन यांच्याविरुद्ध निवडणुक लढवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com