लंकेश खून प्रकरणः गोंधळेकरला बेळगावात फिरवले

लंकेश खून प्रकरणः गोंधळेकरला बेळगावात फिरवले

बेळगाव - महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या सुधन्वा गोंधळेकरला कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश हत्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून गोंधळेकरला घेऊन एसआयटी पथक बेळगावात दाखल झाले आहे. त्याची शुक्रवारी (ता. १४) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सुधन्वा गोंधळेकर उर्फ पांडेजी उर्फ पांडे उर्फ गुर्जर उर्फ महेश पाटील उर्फ सुधीर शंकर गोंधळेकर (वय ३९, रा. सििद्धविनायक मंदिराजवळ सातारा) याची शुक्रवारी (ता. १४)  जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक एम. आर. हरिष यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीचे पथक बेळगावात दाखल झाले आहे. गोंधळेकरला ताब्यात घेउन त्याला शुक्रवारी (ता. ७) प्रथम एसीएमएम न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली होती. सीबीआयच्या ताब्यात असलेल्या गोंधळेकरला बॉडी वॉरंट जारी करुन एसआयटीने ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र एटीएसने गेल्या महिन्यात गोंधळेकरला अटक करुन त्याचे घर व संबधीत ठिकाणी छापे टाकले होते. त्या १२ गावठी पिस्तूल, जिवंत बाँब, व आरडीएक्‍ससह काही स्फोटके जप्त केली होती. त्याच्याजवळ सापडलेल्या १२ बंदुकापैकी गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी वापरलेली पिस्तुलही असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी एसआयटीला दिली होती. लंकेश यांच्या हत्येसाठी त्याने अमोल काळेकडे पिस्तूल दिली होती. त्यामुळे लंकेश हत्या प्रकरणाशी गोंधळेकर याचा संबध असल्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याची बेळगावात चौकशी करण्यात आली असून चिखले येथील त्या रिसॉर्टवरही त्याला नेण्यात आल्याचे समजते. एसआयटीने ताब्यात घेतलेला हा १४ वा संशयीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com