गौरी लंकेश हत्या प्रकरणः कळसकरला बेळगाव, खानापुरात फिरवले

गौरी लंकेश हत्या प्रकरणः कळसकरला बेळगाव, खानापुरात फिरवले

बेळगाव - गौरी लंकेश हत्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरला आठवड्यापूर्वी कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्याची बेळगाव व खानापूर तालुक्‍यात परेड घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, यावेळी त्याची नव्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी त्याला या परिसरात फिरविल्याचे सांगण्यात येते. पोलिस कोठडीत घेतल्यापासून एसआयटीने त्याला दुसऱ्यांदा बेळगावला आणले आहे.

गौरी लंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह चौघा विचारवंतांच्या हत्येमध्ये बरेचसे साम्य आढळून आल्याने महाराष्ट्र एटीएस व कर्नाटकचे एसआयटी पथक समातंररीतीने तपास करीत आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी व लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांचे धागे महाराष्ट्रातील डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी जुळत आहेत. तर तिकडे अटक केलेल्यांचे धागेदोरे कर्नाटकातील हत्येशी जुळत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईतील नालासोपारा परिसरात शस्त्रसाठाप्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकरचा लंकेश हत्या प्रकरणाशीही संबंध असल्याचे समोर आल्यानंतर कर्नाटक एसआयटीने दहा दिवसांपूर्वी त्याला कोठडीत घेतले होते. तेव्हापासून त्याची चौकशी सुरू आहे.

कुठे कोणते नियोजन झाले, याची माहिती घेण्यासाठी खानापूर व बेळगावात त्याची परेड घेतली. सर्व विचारवंतांच्या हत्येमागील मास्टरमाईंड अमोल काळे, बेळगावातून अटक केलेला भरत कुरणे, सुधन्वा गोंधळेकरसह आणखी किती जणांशी त्याचा संबंध आला आहे, याची चौकशी पथकाने केल्याचे समजते.

कळसकरची नावे अनेक
सुधन्वा गोंधळेकरने जशी अनेक नावे धारण केली होती, त्याच पद्धतीने शरद कळसकरनेही अनेक नावे धारण केली आहेत. मूळ केसापुरी, ता. दौलताबाद, जि. औरंगाबादचा असणाऱ्या २५ वर्षांच्या कळसकरचे पूर्ण नाव शरद भाऊसाहेब कळसकर आहे. याशिवाय त्याला छोटूसिंग, शरद पाटील, विष्णू बिन भाऊसाहेब कळसकर या नावांनीही ओळखले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com