प्रा. भगवान हत्येच्या कटाची दावणगेरीत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी के. टी. नवीनकुमार याच्या अटकेचे वृत्त समजताच विचारवंत प्रा. के. एस. भगवान यांच्या हत्येसाठी संशयितांनी दावणगेरीत एकत्र येऊन चर्चा केली होती. गौरी लंकेश हत्याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

एसआयटी पथकाने २१ मे रोजी दावणगेरीत अटक केलेल्या अमोल काळे ऊर्फ बायीसाब, अमित देग्वेकर ऊर्फ प्रदीप महाजन व मनोहर ऊर्फ मनोज यांची चौकशी करताना ही माहिती उघड झाली आहे. हे तिघेही आपली गुप्त योजना पूर्ण करण्यासाठी सुजितकुमार ऊर्फ प्रवीण याची भेट घेण्यास दावणगेरीला आले होते. प्रवीणने हत्या करण्यासाठी काही मुले देण्याची काळेला ग्वाही दिली होती, असे समजते. ते प्रा. भगवान यांची हत्या यशस्वी करण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी दावणगेरीला आले होते. काळे, निहाल ऊर्फ दादा यांचा प्रवीण व मनोज कुमार यांची भेट घेऊन पिस्तुल व काडतूस मिळविण्याचा उद्देश होता, असे स्पष्ट झाले आहे. हत्या करण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या मुलांचा काळे यास परिचय करून देण्यात आला होता. परंतु, त्याचवेळी अटक झाल्याने हत्या करण्याची योजना बारगळली, असेही समजते.

Web Title: Gouri Lankesh Murder case investigation followup