
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याला मंजुरी देण्यात आलीय. यासाठी एकूण ६९ हजार ५१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.