केंद्र सरकार "भांडवलवादी': ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. डाव्यांविरोधातील संघर्षासाठी ओळखल्या जाणाऱ्या ममता यांनी केंद्र सरकार हे "भांडवलवादी" (कॅपिटॅलिस्ट) असल्याची टीका केली आहे.

"परदेशांमध्येही काळे धन हुडकून काढण्यात यश मिळालेले नाही. मात्र काळे धन बाहेर काढण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने जमीन, बॅंक ठेवी, सोने, हिरे यांच्या माध्यमामधून धन निर्माण केले आहे. केंद्र सरकार हे जास्तीत जास्त भांडवलवादी होत आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे लोकांना प्रचंड त्रास होत असून ते आर्थिकदृष्टयाही असुरक्षित झाले आहेत. या निर्णयामुळे 90 लोकांवर प्राण गमाविण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारावयास हवी. दुदैवाचे हे दशावतार कधी थांबणार, हे आता कोणालाच माहिती नाही,'' असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नोटाबंदीचा हा निर्णय भारतास कॅशलेस, तांत्रिकदृष्टया प्रगत बनविण्यासाठीची "ऐतिहासिक संधी' असल्याचे ठाम मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Government becoming 'more and more capitalist', says Mamata