सरकार प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा पुरवू शकत नाही - सुलक्षणा सावंत  

 Government can not provide security to every person - Sulkshna Sawant
Government can not provide security to every person - Sulkshna Sawant

पणजी - दक्षिण गोवा येथे एका 20 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांची जीभ घसरली. सरकार प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देऊ शकत नाही, असे विधान त्यांनी केले आहे. 

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बलात्कारप्रकरणी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नास उत्तर देताना सावंत म्हणाल्या, ""आपल्याला अशा लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असून, एक व्यक्ती दुसऱ्याची रक्षक म्हणून कृती करू शकतो. सध्या बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कारण, महिला अशा तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत.'' अशा प्रकारच्या गुन्ह्यांची पार्श्‍वभूमी असलेले समुद्र किनारे, तसेच ठिकाणांवर सीसीटीव्ही लावावेत, अशी मागणी आपण राज्य पर्यटन विभागाकडे करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, विरोधी पक्ष कॉंग्रेसने सावंत यांच्या विधानावरून भाजपवर आगपाखड करत सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com