आता भारतात सर्वांना प्रवेश पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

air plane.jpg

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे सरकारने फेब्रुवारी 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बंदी घातली होती.

आता भारतात सर्वांना प्रवेश पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- केंद्रीय गृह मंत्रालयाने आज (दि.22) कोरोना गाइडलाइन्समध्ये दुरुस्ती करुन विदेशी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी दिली आहे. सरकारने इलेक्ट्रॉनिक, पर्यटक आणि वैद्यकीय श्रेणी वगळता सर्वांना तत्काळ प्रभावाने व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पर्यटक व्हिसा सोडून सर्व ओसीआय, पीआयओ कार्डधारक आणि इतर विदेशी नागरिकांना कोणत्याही उद्देशाने भारतात येण्यास परवानगी दिली आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणारे विदेशी नागरिक मेडिकल व्हिसासाठी मेडिकल अटेंडंटसह अर्ज करु शकतात. 

गृह मंत्रालयाने निवेदन जारी करुन म्हटले की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे सरकारने फेब्रुवारी 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बंदी घातली होती. सरकारने आता भारतात प्रवेश करणे किंवा बाहेर जाण्यासाठी इच्छुक विदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांना व्हिसा आणि प्रवासाच्या बंदीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.  

हेही वाचा- 'अमित शहांचे देशाच्या विकासात अतुलनीय योगदान'; PM मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

या अंतर्गत सरकारने इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटन व्हिसा आणि मेडिकल व्हिसा सोडून सर्वांना  तत्काळ व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या व्हिसाची वैधता संपली असेल तर त्यांना उपयुक्त श्रेणीतून भारतीय मिशन किंवा संबंधित पदांकडून नवीन व्हिसा मिळू शकेल.

हेही वाचा- 'आत्मनिर्भर भारत'; अँटी-टँक गाइडेड मिसाइल 'नाग'ची चाचणी यशस्वी

वैद्यकीय उपचारासाठी भारतात येऊ इच्छिणारे विदेशी नागरिक आपल्या उपचारासाठी परिचारकासह मेडिकल व्हिसासाठी नव्याने अर्ज करु शकतात. विदेशी नागरिकांना व्यवसाय, संमेलन, रोजगार, अध्ययन, संशोधन, उपचार आदी विविध कारणांसाठी भारतात येण्यास परवानगी मिळेल. सर्व प्रवाशांना कोरोनाबाबतचे आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या नियमांचे पालन करावे लागेल. 

loading image
go to top