'अमित शहांचे देशाच्या विकासात अतुलनीय योगदान'; PM मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पीटीआय
Thursday, 22 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीत आणि पक्षाचे सामर्थ्य वाढवण्यात तुमचे योगदान अतुलनीय आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीत आणि पक्षाचे सामर्थ्य वाढवण्यात तुमचे योगदान अतुलनीय आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा यांना टॅग करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, संपूर्ण देश भारताच्या विकासातील तुमचे समर्पण पाहत आहे. भाजपला मजबूत करण्यासाठीचे तुमचे योगदानही लक्षणीय आहे. देव तुम्हाला देशाची सेवा करण्यासाठी एक दीर्घ आणि निरोगी आयुष्य देईल.

अमित शहा यांचा जन्म 1964 मध्ये मुंबईत झाला. ते तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निगडीत आहेत. गुजरातमध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये गृहमंत्री होते. 2014 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. 

ईशान्य भारतातही पक्षाला विजय मिळवून दिला. 2014 मध्ये ते उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रभारी होते. त्यावेळी राज्यातील लोकसभेच्या 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. 

'आत्मनिर्भर भारत'; अँटी-टँक गाइडेड मिसाइल 'नाग'ची चाचणी यशस्वी

वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शहा यांनी भाजपच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली आणि अनेक सभा घेतल्या. पक्षाने 2014 चा विक्रम मोडत 303 जागांवर विजय मिळवला. भाजप 1971 नंतर देशात पहिला असा पक्ष बनला ज्याने सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण बहुमताने सत्तेत पुनरागमन केले. 

अमित शहा यांनी 2019 मध्ये गांधीनगरमधून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. मोदी सरकारच्या विद्यमान मंत्रिमंडळात ते गृहमंत्री आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi wishes home minister amit shah on his birthday