आता 'यूपीएससी' न देता होता येणार सरकारी अधिकारी

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. मात्र, आता ही परीक्षा उत्तीर्ण न होता वरिष्ठ पदाची नोकरी मिळणार आहे. याबाबत मार्गदर्शिकेसह अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला आता सेवा नियमातही बदल करावा लागणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळते. मात्र, यापुढे वरिष्ठ अधिकारी बनण्यासाठी 'यूपीएससी'ची सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे नसल्याची अधिसूचना मोदी सरकारकडून जारी करण्यात आली. त्यामुळे आता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण न होताही सरकारी अधिकारी बनता येणार आहे.

यापूर्वी केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. मात्र, आता ही परीक्षा उत्तीर्ण न होता वरिष्ठ पदाची नोकरी मिळणार आहे. याबाबत मार्गदर्शिकेसह अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला आता सेवा नियमातही बदल करावा लागणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. जितेंद्रसिंह म्हणाले, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गुणवंत आणि कुशल उमेदवारांना योग्य संधी मिळणार असून, भारतीय नागरिकांना स्वतःची प्रतिभा आणि क्षमता दाखवता यावी, यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
 

Web Title: government mulls lateral entry in top bureaucracy application asked for joint secretary post of 10 departments