रस्त्यांच्या दुर्दशेला सरकार जबाबदार - गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

गेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने चौकशी करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी केली. 

गोवा - राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशेला भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. दुय्यम दर्जाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने चौकशी करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी केली. 

फोंडा - मडगाव राज्य महामार्गाचे डांबरीकरण खचले तसेच उखडले आहे. मिरामार ते दोनापावल हा सिमेंट काँक्रिटचा रस्त्याचे योग्यरित्या अभियांत्रिकीकरण करण्यात न आल्याने तेथील रस्ता मुसळधार पाऊस पडल्यावर पूर्णपणे पाण्याखाली जात आहे. जनतेकडून विविध कर आकारले जात आहेत मात्र त्याच्या बदल्यात नागरिकांना चांगली सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातील सर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तसेच गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात आली आहेत. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मदतीने ही स्वतंत्रपणे दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी असे नाईक म्हणाले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The government is responsible for the bad condition of roads said goa congress