नवी दिल्ली : रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे काल (शुक्रवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक मोठा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू ठेवण्यासाठी १२,०६० कोटी रुपये मंजूर करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, 'या योजनेमुळे गरीब माता-बहिणींच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. त्यांना मिळणारे एलपीजी अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'