सरकारने कामात सुधारणा करावी- सुशीलकुमार

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नवी दिल्ली - लोकशाहीची गळचेपी होत असून सरकारने आपल्या कामात सुधारणा केली पाहिजे, या शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सरकारचे कान टोचले. 

लोकशाहीची गळचेपी होत असल्याबद्दल सर्व विरोधी पक्षांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. याबाबतीत पत्रकारांनी शिंदे यांना विचारले असता लोकशाहीची गळचेपी होत असून सरकारने आपल्या कामात सुधारणा केली पाहिजे, अशी टिप्पणी शिंदे यांनी केली. राष्ट्रपतींना विरोधी पक्षातील इतके लोक भेटतात याची सरकारने नोंद घेतली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत विचारले असता सुशीलकुमार शिंदे म्हणाले की नारायण राणे यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट खासगी असेल, मी त्यांची मुलाखत ऐकली असून ते भाजपमध्ये जातील असे वाटत नाही. या चर्चेमुळे काँग्रेसमधील वातावरण अस्थिर होत नाही. 

निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रामधील घोटाळा दाखवा या आव्हानाबद्दल बोलताना घोटाळा कसा असतो हे प्रत्येक वेळेला दाखवला जात नाही परंतु आता ते दाखविले जातील असे सुचक वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

जाधव यांच्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी
कुलभूषण जाधव यांच्या बाबत भारत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. त्याबाबत पाकिस्तानशी झगडले पाहिजे, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
 
Web Title: government should improve their work