
Government Taxi Service: केंद्र सरकार लवकरच ओला, उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरु करणार आहे. सहकारी टॅक्सी सेवा लवकरच सुरु केली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केली. यामुळे कॅब चालकांना जास्त फायदा होणार आहे. कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालवणारे लोक नोंदणी करू शकतील, अशी माहिती त्यांनी दिली. यातून मिळणारा संपूर्ण नफा थेट ड्रायव्हरला जाईल आणि त्याच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही.