गोवा: राज्यपालांनी संकेत पाळले नाहीत- दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देताना घटनेचे संकेत पाळले नाहीत. 

- दिग्विजयसिंह

पणजी : "आम्ही 12 मार्चच्या संध्याकाळपासून गोव्याच्या राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागत आहोत. मात्र, त्यांनी अद्याप आम्हाला वेळच दिलेला नाही," असे काँग्रेसचे प्रभारी दिग्विजयसिंह यांनी सांगितले. 

भाजपने कमी जागा जिंकूनही सरकार बनविण्याचा दावा करणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. दिग्विजयसिंह यांनी यावर ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देताना घटनेचे संकेत पाळले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. 
"कार्यपद्धती असे आहे की नेहमी सर्वांत जास्त संख्या असणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले जाते. राज्यपालांनी ही पद्धत अवलंबली पाहिजे. प्रस्थापित नियमांनुसार राज्यपालांनी घटनेच्या चौकटी काम करायला हवे," असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: governor did not follow constitution, says digvijay singh