Senthil Balaji: राज्यपालांनी आमदाराची मंत्रिमंडळातून केली हाकालपट्टी; स्टॅलिन सरकारला मोठा झटका

थेट राज्यपालांनी मंत्र्याची हाकालपट्टी केल्यानं आता देशातील राजकारणात याचे पडसाद उमटू शकतात.
tamil nadu cm m k Stalin warns bjp after minister s arrest calls it vendetta politics bjp-denies cites supreme court order
tamil nadu cm m k Stalin warns bjp after minister s arrest calls it vendetta politics bjp-denies cites supreme court orderSakal

चेन्नई : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मोठं पाऊल उचलत ईडीच्या कारवाईनंतर तुरुंगात असलेले आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली आहे. या कारवाईचं प्रेसनोट काढत राजभवन कार्यालयाकडून माहिती देण्यात आली.

पण अशा प्रकारे राज्यपालांच्या तडकाफडकी कारवाईमुळं तामिळनाडूमधील राजकारण तापलं असून स्टॅलिन यांच्या सरकारला हा मोठा झटका मानलं जात आहे. (Governor R N Ravi expels MLA Senthil Balaji from Cabinet of TamilNadu a big blow to Stalin government)

राजभवनाचं स्पष्टीकरण

राजभवनातून यासंदर्भात काढलेल्या प्रेस नोटमध्ये आमदार सेंथील बालाजी यांची तात्काळ प्रभावानं हाकालपट्टी करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या तातडीच्या कारवाईचं कारण सांगताना राजभवनानं म्हटलं की, "तुरुंगवास भोगावा लागल्यानंतरही बालाजी यांचं मंत्रिमंडळात कायम राहिल्यास कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर विपरित परिणाम होईल"

tamil nadu cm m k Stalin warns bjp after minister s arrest calls it vendetta politics bjp-denies cites supreme court order
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; CM शिंदे दिल्लीला रवाना, शहांची घेणार भेट

नोकऱ्यांसाठी लाच घेणे तसेच भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये आमदार व्ही सेंथिल बालाजी यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. चेन्नईतील कोर्टानं मनी लाँडरिंगच्या केसमध्ये बालाजी यांची न्यायालयीन कोठडी १२ जुलैपर्यंत वाढवली होती. बालाजी हे कावेरी रुग्णालयातून व्हिडिओ कन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीशांसमोर हजर झाले होते. (Latest Marathi News)

tamil nadu cm m k Stalin warns bjp after minister s arrest calls it vendetta politics bjp-denies cites supreme court order
Video: शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी धडपड : Bakri Eid

ईडीनं १४ जूनला केलं होती अटक

ईडीनं १४ जून रोजी ईडीनं सेंथिल बालाजी यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत अटकेची कारवाई केली होती. नंतर चौकशीदरम्यान अस्वस्थता आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर बालाजी यांना ओमांदूरार सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या जजनं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना कावेरी रुग्णालयात हालवण्यात आलं, या ठिकणी त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली.

tamil nadu cm m k Stalin warns bjp after minister s arrest calls it vendetta politics bjp-denies cites supreme court order
Chandrashekhar Azad: CM आदित्यनाथ गुन्हेगारांना संरक्षण देताहेत अन्...; गोळीबाराच्या घटनेवर आझाद यांचा गंभीर आरोप

राज्यपालांना अधिकार आहेत का?

सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणारे राज्यपाल कोण आहेत? अशी कृती करण्याचा संविधानिक अधिकार त्यांच्याजवळ आहे का? ते सनानत धर्माप्रमाणं काम करत आहेत. पण सनातन धर्म आपल्या देशाचा कायदा नाही. आपलं संविधानचं आपलं बायबल, गीता, कुराण आहे. आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी संविधान वाचाव. त्यांच्याजवळ अधिकार नाहीत. आपल्या बॉसला खुश करण्यासाठी ते अशा पद्धतीनं काम करत आहेत, अशा शब्दांत डीएमके नेता सरवनन अन्नादुरई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com