काश्मीरमधील निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथील करणार : राज्यपाल

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

काश्मीरमधून कलम 370 हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात काही निर्बंध घातले होते. तसेच कलम 370 हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथील केले जाणार आहेत. 

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कलम 370 कलम हटविल्यानंतर केंद्र सरकारने घातलेले निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथील करण्यात येतील, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

काश्मीरमधून कलम 370 हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात काही निर्बंध घातले होते. तसेच कलम 370 हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथील केले जाणार आहेत. 

मलिक म्हणाले, की 15 ऑगस्टनंतर राज्यातील वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील. तसेच फोन, इंटरनेट ही माध्यमे युवकांना भडकवण्याची तसेच त्यांची दिशाभूल करण्याची कामे करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोवर यावरील निर्बंध कायम राहतील. आठवडाभरात किंवा दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर यावरील निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Satyapal Malik says restrictions will be eased after August 15