esakal | ‘राज्यपालपदा’वर उत्तर प्रदेशचेच राज्य
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar-Pradesh

उत्तर प्रदेश केवळ लोकसभेतील सत्तेची चावीच राहिलेला नाही तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार आले तेव्हापासून गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ भाजप नेत्यांना राज्यपालपदी जास्तीत जास्त संधी मिळत आहे. या एका राज्यातून येणारे सर्वाधिक म्हणजे ८ राज्यांचे राज्यपाल सध्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील उत्तर प्रदेशातूनच येतात.

‘राज्यपालपदा’वर उत्तर प्रदेशचेच राज्य

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश केवळ लोकसभेतील सत्तेची चावीच राहिलेला नाही तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार आले तेव्हापासून गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ भाजप नेत्यांना राज्यपालपदी जास्तीत जास्त संधी मिळत आहे. या एका राज्यातून येणारे सर्वाधिक म्हणजे ८ राज्यांचे राज्यपाल सध्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील उत्तर प्रदेशातूनच येतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बनारस विद्यापीठातील अभाविप नेते ते वाराणसीला लागून असलेल्या गाझीपूरमध्ये राजकीय कारकीर्द घडविणारे मनोज सिन्हा जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल बनल्यानंतर राजकीय वर्तुळात या वेगळ्या गोष्टीचीही चर्चा आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग सर्वाधिक ८० खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशातून जातो हे उघड आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंडित नेहरू व इंदिरा गांधींपासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत आतापावेतो सर्वाधिक पंतप्रधानही याच राज्याने देशाला दिले आहेत. त्यामुळेच भाजपचा राज्यसभेतील बहुमताचा मार्गही याच राज्यातून व तेही या वर्षाअखेरीसच प्रशस्त होईल असा विश्‍वास सत्तारूढ नेतृत्वाला आहे. त्याजोडीलाच आता सक्षम राज्यपाल देणारे राज्य अशीही या प्रदेशाची नवी ओळख बनू पहात आहे. 

जम्मू काश्‍मीरचे माजी राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांची मोदी सरकारने भारताचे महालेखापाल (कॅग) म्हणून केल्यावर सिन्हा यांना तेथे पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ज्येष्ठ भाजप नेते राज्यपाल सध्या विविध राज्यांत कार्यरत आहेत. 

राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याणसिंह हे तर रामजन्मभूमीच्या आंदोलनकाळात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीच होते. 

उत्तर प्रदेशीय राज्यपाल

  • जम्मू-काश्‍मीर : मनोज सिन्हा 
  • उत्तराखंड : बेबीरानी मौर्य 
  • राजस्थान : कलराज मिश्र 
  • गोवा : सत्यपाल मलिक 
  • बिहार : फागू चौहान 
  • अरुणाचल प्रदेश : ब्रिगेडियर बी.डी मिश्रा 
  • केरळ : अरिफ महंमद खान 
  • गुजरात : ओ.पी कोहली (मूळचे नोएडाचे)

Edited By - Prashant Patil