राज्यपालांचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतासाठी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम : केरळचे राज्यपाल न्या. पी. सदाशिवम यांनी आपले महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज दिले. जगभरातील मल्याळी नागरिकांनी या आपत्तीच्या काळात मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी नुकतेच केले होते. 
पंतप्रधानांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी आधीच 600 कोटींची मदत दिली आहे. तसेच राज्य सरकारकडून परिस्थितीबाबतचा अहवाल आल्यानंतर आणखी मदत देण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली.

केरळचे पोलिस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनीही एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहे, तसेच सहकाऱ्यांनाही मदत देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, देशभरातून केरळमध्ये मदतीचा ओघ वाढला असून चेंगनूर कुट्टनाड येथे मदत छावण्यांवर काम करण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि स्वयंसेवकही आले आहेत. पथनमथिट्टा जिल्ह्यातील रान्नी गावातील अनेक घरे व दुकाने पुरात वाहून गेली आहेत. स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक जण चर्चच्या छतावर गेले होते. ते छत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. याच भागातील काक्की धरणाचे दरवाजे पूर्वसूचना न देता उघडण्यात न आल्याने रान्नी येथे अनेक ठिकाणी पुन्हा पुराची स्थिती निर्माण झाली. चेंगनूर आणि कुट्टनाड भागात उद्यापासून लोकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. 

Web Title: Governor's salary for the help of flood victims