esakal | कोविडसंबंधीच्या खोट्या बातम्यांची सरकारकडून गंभीर दखल; उचललं मोठं पाऊल!

बोलून बातमी शोधा

social media
कोविडसंबंधीच्या खोट्या बातम्यांची सरकारकडून गंभीर दखल; उचललं मोठं पाऊल!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडलं आहे. मात्र, संकटाच्या या काळात सोशल मीडियावर खोट्या आणि चुकीच्या बातम्यांची लाट आली आहे. जु्न्या बातम्या आणि जुने फोटो कोविड-१९ आजाराशी जोडून सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. हे पाहता केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडियातील या संबंधी १०० हून अधिक पोस्ट हटवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व पोस्ट खोट्या असल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

हेही वाचा: ऑक्सिजनची चिंता मिटणार? PM केअर्स फंडातून मोठी मदत

गेल्या काही काळापासून कोरोना महामारीमुळे संबंधित जुन्या सूचना, खोट्या बातम्या, चुकीचे फोटो आणि आकडेवारीचा सोशल मीडियावर वेगाने प्रसार होत आहे. सोशल मीडिया युजर्स सोशल साईट्सचा चुकीचा वापर करत होते. यावर सरकारची नजर पडली आणि तात्काळ प्रभावाने सुमारे १०० पोस्ट डिलीट करण्यात आल्या. लोकांकडून खोटी माहिती आणि आकडेवारी व्हायरल होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. मंत्रालयाचं म्हणणं आहे की, कोरोनावर काही सोशल युजर्स खोटी माहिती पसरवत होते, ज्यामुळे संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काही पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.