esakal | ऑक्सिजनची चिंता मिटणार? PM केअर्स फंडातून मोठी मदत

बोलून बातमी शोधा

oxygen

देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जाहीर केलंय की, पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून देशभरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे 551 पीएसए (प्रेशर स्विंग एडसॉर्प्शन) यंत्र बसवले जाणार आहेत.

ऑक्सिजनची चिंता मिटणार? PM केअर्स फंडातून मोठी मदत
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जाहीर केलंय की, पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून देशभरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे 551 पीएसए (प्रेशर स्विंग एडसॉर्प्शन) यंत्र बसवले जाणार आहेत. कोरोना काळात अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवटा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे.

पीएम कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना संक्रमण वाढत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे पंतप्रधान मदत निधी आणि पीएम केअर्स फंडातून देशातील विविध राज्यांच्या आरोग्य केंद्रांमध्ये 551 पीएसए ऑक्सिजन निर्मिती यंत्र बसवले जातील. यासाठी सैद्धांतिक मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यंत्रांना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. पीएसए हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आल्यास ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या कमी होऊ शकणार आहे.

हेही वाचा: कोरोना महामारीमुळे परीक्षांवर टांगती तलवार; लवकरच होणार CA परीक्षेची मोठी घोषणा

हेही वाचा: दिलासा...नव्या कोरोना बाधितांच्या बरोबरीने बरे होणाच्या प्रमाण

यंत्र विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील सरकारी हॉस्पिटलमध्ये बसवले जातील. याआधी पीएम केअर्स फंडातून विविध राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये 162 पीएसए ऑक्सिजन उत्पादन यंत्र बसवण्यात आलेत, यासाठी 201.58 कोटी रुपये देण्यात आले होते. देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून ऑक्सिजन मिळवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

देशातील कोरोना स्थिती

देशात कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. दररोज नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगवेगळे रेकॉर्ड बनवत आहे. भारतात शनिवारी (ता.२४) दिवसभरात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ एवढी झाली आहे. सलग चौथ्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. सध्या देशात २६ लाख ८२ हजार ७५१ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात २ लाख १७ हजार ११३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.