
आर्थिक गुन्हे शाखेचा छापा पडला तर आपल्याकडे असलेला काळा पैसा सापडेल या भीतीमुळे सरकारी इंजिनिअरनं तब्बल २ ते ३ कोटी रुपयांची रोकड जाळून टाकली. त्यानंतरही त्याच्याकडे ३९ लाख रुपये आढळून आले. बिहारमध्ये ही घटना उघडकीस आली असून विनोद राय असं इंजिनिअरचं नाव आहे. तो ग्रामीण कार्य विभागात कार्यरत होता. पोलिसांनी विनोदसह त्याच्या पत्नीला नोट जाळल्या प्रकरणी आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आलीय. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी वेगळा खटला चालवला जाईल.