झाकीर नाईकांची संघटना धोकादायकच! केंद्राने आणखी पाच वर्षांसाठी वाढवली बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The controversial Muslim preacher Zakir Naik will be brought to India

झाकीर नाईकांची संघटना धोकादायकच! केंद्राने आणखी पाच वर्षांसाठी वाढवली बंदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : मलेशियामध्ये राहत असलेले इस्लामी उपदेशक झाकीर नाईक (Zakir Abdul Karim Naik) यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवरील बंदी भारत सरकारने आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (Islamic Research Foundation - IRF) वरील ही कारवाई बेकायदेशीर कारवायांबद्दल झाली आहे. सर्वांत आधी 17 नोव्हेंबर 2016 मध्ये बेकायदेशीर कारवायांप्रकरणी (Unlawful Activities Prevention Act 1967) इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर कारवाई करत बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आली होती.

हेही वाचा: मालेगाव हिंसाचार : एका बड्या नेत्याच्या भावाचा शोध सुरू

केंद्रीय गृह मंत्रालयाने आता मंगळवारी एका अधिसूचनेमध्ये म्हटलंय की, IRF ही देशासाठी हानीकारक असणाऱ्या कारवायांमध्ये आघाडीवर आहे. ही संघटना देशातील शांतता आणि धार्मिक सौहार्द देखील बिघडवण्याची शक्यता आहे. तसेच या संघटनेमुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष ढाच्याला बाधा पोहचण्याची शक्यता असल्याकारणाने ही कारवाई करण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने म्हटलंय की, IRF या संघटनेचे अध्यक्ष झाकीर नाईक यांच्याद्वारे करण्यात येणारी वक्तव्ये आणि त्यांची भाषणे ही वादग्रस्त आहेत. ते आपल्या भाषणांद्वारे दोन धर्मांत तेढ निर्माण होऊन वैरभाव उत्पन्न होईल, अशी वक्तव्ये करतात. झाकीर नाईक भारतात तसेच विदेशात एका विशिष्ट धर्माच्या युवकांना दहशतवादी कृत्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करत असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: मालेगाव हिंसाचार | "राष्ट्रवादी आणि जनता दलचा दंगलीशी संबंध नाही"

नाईक आंतरराष्ट्रीय सॅटेलाइट टीव्ही नेटवर्क, इंटरनेट, प्रिंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांसमोर मूलगामी विधाने आणि भाषणे करतात, जी प्रक्षोभक आहेत, असेही त्यात म्हटले आहे. गृह मंत्रालयाने पुढे म्हटलंय की, या सगळ्या मुद्यांचा विचार करता यूएपीए अंतर्गत IRF वर लादण्यात आलेली बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image
go to top