मालेगाव हिंसाचार | "राष्ट्रवादी आणि जनता दलचा दंगलीशी संबंध नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maulana mufti

मालेगाव हिंसाचार | "राष्ट्रवादी आणि जनता दलचा दंगलीशी संबंध नाही"

मालेगाव (जि.नाशिक) : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी मालेगावात दंगल घडविण्याबद्दल माहिती दिली. मात्र मालेगावात हिंदू-मुस्लिम (hindu-muslim) दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला, पण दंगल झाली नाही. तसेच मालेगावमध्ये राष्ट्रवादी आणि जनता दल यांचा दंगलीशी काहीही संबंध नाही. असे वक्तव्य मालेगावचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी आज केले

रात्रीतून मालेगाव मध्ये दगड आणून ठेवले गेले

8 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी एक नगरसेवकांनी कॉर्नर मीटिंग घेतली होती, त्यावेळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. रात्रीतून मालेगाव मध्ये दगड आणून ठेवले गेले, पोलीस जखमी झाले पण त्यांनी फायरिंग केले नाही. असा आरोपही मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला.

दरम्यान त्रिपुरातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक शहरासह मालेगाव आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी कडेकोट बंद पाळण्यात आला होता. मालेगावात जमावाकडून दगडफेक, दुकानांची तोडफोड करण्यात आली. नाशिकमध्ये शांततेसाठी दुआ पठण करण्यात आले. हिंसाचारात तीन अधिकाऱ्यांसह १० पोलिसांसह शांतता कमिटीचे तीन ते चार जण जखमी झाले. विशेष म्हणजे मालेगावमध्ये याप्रकरणी बहुतांश राजकीय क्षेत्राशी संबंधितांचे अटकसत्र सुरू आहे.

हेही वाचा: प्रोटोकाॅल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री कराडांनी प्रवाशावर केले उपचार

आम्ही विरोधक असल्याने अन्याय

दोन वर्षापासून पाठपुरावा करूनही एक रुपया मिळाला नाही मग जिल्हा नियोजन समिती बैठकीला बसून करायचे काय? नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना 2 वर्षात काही निधी मिळाला. आम्ही विरोधक असल्याने अन्याय केला जात आहे. सत्ताधारी आपल्या आमदारांना निधी देतात. आम्हाला निधी न मिळण्यास जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जबाबदार आहेत. असे वक्तव्य मालेगाव मध्य एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केले. जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान निधीच मिळत नसल्याने नाराज आमदार बैठकीबाहेर निघून आले.

हेही वाचा: CHINA | विद्यापीठ कॅम्पस लॉक; 1500 विद्यार्थी हॉटेलमध्ये स्थलांतरित

loading image
go to top