गृहनिर्माण क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न : पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

सर्वसामान्यांना हक्काची घरे सहज आणि अडचणीविना उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, यासाठी गृहनिर्माण क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले. 

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना हक्काची घरे सहज आणि अडचणीविना उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, यासाठी गृहनिर्माण क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले. 

पंतप्रधान मोदींनी 'प्रधानमंत्री आवास योजने'ची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार आहे. गृहनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे घरबांधणी जलदगतीने करणे शक्‍य झाले आहे. सरकारच्या या योजनेमुळे दिव्यांग, अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील लोकांना स्वस्त दरात घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच 'प्रधानमंत्री आवास योजने'मुळे नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  
 

Web Title: Govt working to free housing sector from corruption middlemen says PM Narendra Modi