

Grandson Has No Right Over Grandfather's Land, Says High Court
Esakal
वडील जिंवत असताना आजोबांच्या जमिनीवर नातू हक्क सांगू शकतो का? राजस्थानमध्ये जमिनीच्या एका प्रकरणात नातवाने वडील आणि काकांकडून आजोबांची ७५ बीघा जमीन विकण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलंय. नातवाने दिवा केला होता की आजोबांच्या जमिनीवर माझाही अधिकार आहे आणि माझ्या परवानगीशिवाय जमीन विकता येणार नाही. पण हे प्रकरण आजोबांची जमीन असण्यापुरतं नव्हतं. आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना मिळालेल्या जमिनीवर नातू वडिलोपार्जित संपत्ती म्हणून अधिकार सांगू शकतो का? की त्यावर वडिलांचा हक्क असेल? असे प्रश्न उपस्थित झाले होते.