esakal | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महिला करणार लष्कराचं नेतृत्त्व
sakal

बोलून बातमी शोधा

granting permanent commission to women officers in Army decision in SC

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महिला करणार लष्कराचं नेतृत्त्व

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लष्करात नेतृत्त्व करणाऱ्या महिला जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाने खुशखबर दिली आहे. महिलांनाही लष्करात समान संधी द्या असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं आहे. सरकारने लष्करात महिलांकडे नेतृत्व देण्यास नकारात्मक भूमिका व्यक्त केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले असून, महिलांना समान संधी द्या असे सुनावले आहे. 

मोहन भागवतांच्या वक्तव्याला सोनम कपूर म्हणाली 'फुलिश'

लष्करातील तुकडीचे नेतृत्त्व महिलांकडे देण्याबाबतचा महत्त्वाचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान देत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. पण, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकराच्या या आव्हानाची दखल घेत महिलांना सैन्यात समान संधी देण्याबाबत निर्णय दिला आहे. तसेच सरकारला हा आदेश लवकरात लवकरत आमलात आणावा यासाठी आदेश दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्करात समानता हवी, शारिरीक मर्यादा आणि सामाजिक नियमांमुळे महिलांना नेतृत्त्वापासून नाकारले जाऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांविषयीची मानसिकता बदलावी व महिलांसाठी कमांड पोस्ट हे पद तयार करावे असे आदेश न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिले आहेत. 

लेफ्टनंट कर्नल सीमा सिंह यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हा ऐतिहासिक व सुधारणावादी निर्णय असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने शारिरीक क्षमता, तसेच इतर अनेक बाबींमुळे महिलांचे नेतृत्त्व नाकारले होते.