

Owls spark fear after swooping attacks in Greater Noida society.
Sakal
भटके कुत्रे आणि माकडांच्या त्रासाने आधीच हैराण असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडातील नागरिकांसमोर आता एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. ग्रेटर नोएडा वेस्टमधील ‘ला रेसिडेन्शिया’ सोसायटीमध्ये घुबडांच्या जोडीकडून नागरिकांवर झडप घालण्याच्या घटना घडत आहेत. रात्री आणि पहाटेच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर अचानक घुबडे झडप घालत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोसायटीच्या परिसरातील झाडे, पथदिवे आणि इमारतींच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घुबडांची एक जोडी दिसत आहे. रात्रीच्या वेळी किंवा पहाटे नागरिक कॉमन एरिया, पार्किंग किंवा रस्त्यावरून जात असताना ही घुबडे अचानक हवेतून खाली येऊन त्यांच्या डोक्यावर किंवा अंगावर झडप घालत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.