
Greater Noida Woman Jumps with 11 Year Old Son from 13th Floor
Esakal
मुलाच्या आजारपणाला कंटाळून महिलेनं मुलासह इमारतीच्या १३व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. मुलाच्या आजारपणामुळे आई नैराश्यात गेली होती. तिनं नोकरीही सोडली होती. ११ वर्षीय मुलाला मानसिक आजार होता. त्याच्या आजारपणाला कंटाळून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. पतीला आपल्यामुळे त्रास नको, आम्ही तुम्हाला सोडून जातोय अशी चिठ्ठीही आत्महत्येआधी लिहिलीय. ग्रेटर नोएडातील वेस्टच्या ऐस सिटी सोसायटीच्या १३व्या मजल्यावर कुटुंब राहत होते.