रतन टाटांचा मोठेपणा! वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये केली मोठी गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रतन टाटांचा मोठेपणा! वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये केली मोठी गुंतवणूक

रतन टाटांचा मोठेपणा! वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये केली मोठी गुंतवणूक

उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यावसायिक रतन टाटा यांनी गुडफेलोज या स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे.जे वृध्द व्यक्तीना मदत करते. मात्र गुंतवणुकीच्या रकमेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. रतन टाटा यांनी टाटा समूहातून निवृत्ती घेतल्यापासून त्यांनी अनेक स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहेत.

संस्थापक कोण आहेत

नवीन स्टार्टअप ज्यामध्ये रतन टाटांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे, त्याची स्थापना शंतनू नायडू यांनी केली आहे. कॉर्नेल विद्यापीठात शिकलेले 25 वर्षीय नायडू टाटा यांच्या कार्यालयात आहेत आणि 2018 पासून टाटा यांना मदत करत आहेत.

काय आहेत स्टार्टअप ची वैशिष्टै

स्टार्टअप तरुण पदवीधरांना ज्येष्ठ नागरिक ग्राहकांच्या साथीदार म्हणून 'काम' करण्यासाठी नियुक्त करते. कंपनी गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील बीटा टप्प्यात 20 वृध्दांसोबत काम करत आहे आणि पुणे, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये मध्ये योजनेचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

हेही वाचा: समलिंगी मालकाच्या कुत्र्याला मंकीपॉक्सची लागण, मंकीपॉक्स माणसापासून प्राण्यांमध्ये

रतन टाटा काय म्हणाले

रतन टाटा यांनी या योजनेचे स्वागत केले,आणि म्हणाले जोपर्यंत तुम्ही वृध्द होत नाही तो पर्यांत कोणाला ही म्हतारे होवू असं वाटत नाही,आणि एक चांगल्या स्वभावाचा मित्र मिळणे अशक्य आहे.

दरम्यान स्टार्टअपचे अध्यक्ष नायडूनी टाटा यांना आधारस्तंभ,रक्षक,आणि मित्र म्हणुन संबोधले आहे. तो म्हणाले देशात 5 करोड वृध्द माणसे आहेत,जे एकटेच आहेत. पुढ म्हणाले की ही याजना देश भर पोचवासची आहे,पण यातुन मिळणाऱ्या अनुभपव घेवुन पुढे जायच आहे.

Web Title: Greatness Ratan Tata Huge Investment Startups Elderly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ratan tataTata Group