‘मॅन्युफॅक्‍चरिंग हब’ला हिरवा कंदील

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 मार्च 2020

औषधटंचाई नाही 
कोरोना संकटामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता मंत्री मनसुख मंडाविया यांनी फेटाळून लावली. औषधनिर्मितीसाठी ३ ते ४ महिन्यांपर्यंत लागणारे एपीआय आपल्याकडे उपलब्ध असल्याने अशी टंचाई होणार नाही. यासोबतच भारतात १२ हजार औषधनिर्मिती केंद्रे असून, देशांतर्गत गरज भागवून निर्यातही केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नवी दिल्ली - इलेक्‍ट्रॉनिक उत्पादने, औषधनिर्मिती व वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्रात भारताला ‘मॅन्युफॅक्‍चरिंग हब’ बनविण्याच्या योजनांना केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला. त्यासाठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन सवलती जाहीर करतानाच पाच वर्षांत भारताला औषध उत्पादनात स्वावलंबी बनविण्याचे लक्ष्यही सरकारने ठरविले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ बैठक होऊन त्यात विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, औषधनिर्माण विभागाचे मंत्री मनसुख मांडविया यांनी आज माहिती दिली. इलेक्‍ट्रॉनिक उत्पादन; तसेच औषधनिर्माण क्षेत्रातील योजनांच्या मंजुरीसोबतच मंत्रिमंडळाने भारत बेल्जियम गुन्हेगार प्रत्यार्पण करारावरही शिक्कामोर्तब केले. 

माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इलेक्‍ट्रॉनिक उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन योजनेची माहिती दिली. याअंतर्गत सरकारने उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन सवलतीच्या तीन योजना आणल्या असून, याअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना गुंतवणूक आणि उत्पादनांच्या विक्रीवर चार ते सहा टक्‍क्‍यांची सवलत मिळेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green Signal for Manufacturing Hub