
लग्नाचं वऱ्हाड घेऊन नवरदेव नवरीच्या गावी पोहोचला पण तिथं ना नवरी होती ना तिचं घर. नवरीशिवाय नवरदेवाला घरी परतावं लागलं. हिमाचल प्रदेशातल्या ऊना इथं मंगळवारी हा प्रकार घडला. नवरदेव वऱ्हाडी, बँडबाजा घेऊन नवरीच्या गावी पोहोचला. पण तिथं स्वागताला कुणीच आलं नाही. नवरदेव आणि वऱ्हाडींना सुरुवातीला आश्चर्य वाटलं. त्यानंतर नवरीचं घर कुठे आहे हे शोधायला गेले तर ना घर मिळालं, ना नवरी सापडली. ज्या महिलेनं लग्न जुळवलं होतं तीसुद्धा गायब होती.