
महाकुंभ मेळ्यातील दुसऱ्या आणि सर्वात मोठ्या मौनी अमावस्येच्या ब्राह्ममुहूर्ताच्या आधी मोठी दुर्घटना घडली. मध्यरात्री दीडच्या सुमारास संगमावर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला. तर ९० जण जखमी झाले आहेत. ३० पैकी २५ मृतांची ओळख पटलीय. तर पाच जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिलीय.