नवरदेवाला नाही आवरला नृत्याचा हाव अन् गटारात पडलाना भाव!

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नोएडा (उत्तर प्रदेश): विवाहाची वरात मोठ्या उत्साहात सुरू होती. गाण्याच्या नृत्यावर देहभान विसरून अनेकजण नृत्य करत होते. काही वेळानंतर नवरेदेवालाही राहवले नाही. नवरदेवाने गाण्यावर ठेका धरला अन् त्याला साथ देण्यासाठी अनेकजण नृत्य करू लागले. नृत्य सुरू असताना वरात एका पुलावर आली अन् पुल कोसळला. नवरदेवासह नृत्य करणारे सर्वजण गटाराच्या पाण्यात पडले. यामध्ये दोन मुले जखमी झाले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नोएडा सेक्टर 52 मधील होशियारपूर गावातील अमित यावदचा न्यू कोंडली परिसरात राहणाऱ्या फूल सिंह यांच्या कन्येशी शनिवारी (ता. 9) विवाह होता. विवाहासीठी सेक्टर 52मधील ऑलिव्ह गार्डन येथे हॉल बूक करण्यात आला होता. विवाहाची लगबग जोरात सुरू होती. रात्री नऊच्या सुमारास अमित आणि वराती बँड बाजासह मंडपाच्या बाहेर पोहोचले. मंडपाजवळ असलेल्या पुलावर सर्वजण नाचत असताना पूल कोसळला. त्यामुळे वरासह 15 जण गटारात पडले. गटारामध्ये पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी शिडी लावून गटारात पडलेल्यांना बाहेर काढले. या प्रकारात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गटारात पडल्याने अनेकांचे सोन्याच्या दागिने व मोबाइल गटारामध्ये गहाळ झाल्याचा दावा वर पक्षाकडील नातेवाईकांनी केला आहे.

नवरदेवास गटारामधून बाहेर काढल्यानंतर अंघोळ करून कपडे बदलून विवाहाची औपचारिकता पूर्ण केली. मात्र, झालेल्या प्रकारामुळे मुलाकडील नातेवाईक संतप्त झाले होते. अखेर हॉल मालकाने तीन लाख रुपये देत दिलगिरी व्यक्त केली व गोंधळ शांत झाला. दरम्यान, यामध्ये तडजोड झाल्याने कोणीही तक्रार दाखल केली नाही. मात्र, या घटनेची चर्चा परिसरामध्ये चांगलीच रंगली.

Web Title: Groom falls in drain after bridge collapses due to baraat dance in Noida