काय सांगता! लग्नात पाहुणा म्हणून आला आणि नवरदेव झाला

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 January 2021

कर्नाटकच्या चिकमगळूर जिल्ह्यात लग्न तुटल्याने एक दुर्मिळ घटना पाहायला मिळाली आहे.

बंगळुरु- कर्नाटकच्या चिकमगळूर जिल्ह्यात लग्न तुटल्याने एक दुर्मिळ घटना पाहायला मिळाली आहे. लग्नाच्या दिवशीच नवरा मुलगा आपल्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला. त्यानंतर नवरी मुलीने लग्नात आलेल्या एका पाहुण्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या संमतीने त्याच लग्न मंडपात त्यांचे लग्न झाले.  

माहितीनुसार ही घटना चिकमगळूर जिल्ह्यातील तरिकेरे तालुक्यातील आहे. येथील दोन भाऊ अशोक आणि नवीन यांचे रविवारी लग्न होते. नवीनने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लग्नापूर्वीचे सर्व सोपस्कार केले. पण, लग्नाच्या दिवशीच नवीन अचानक गायब झाला. त्यानंतर समोर आलं की नवीनच्या गर्लफ्रेंडने त्याचे लग्न तोडण्यासाठी लग्न समारंभात पाहुण्यांसमोरच विष पिण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेला नवीन आपल्या गर्लफ्रेंडसोबत तुमाकुरुला पळून गेला.  

देशाच्या गतीमान विकासासाठीचा कॉरिडॉर; PM मोदींच्या हस्ते जगातील पहिल्या डबल...

स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशी नवीनचा भाऊ अशोकचे तर लग्न झाले, पण सिंधूच्या परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सिंधुने समारंभास्थळीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तेथेच मुलाचा शोध सुरु केला. मजेशीर गोष्ट म्हणजे मुलीच्या कुटुंबीयांनी चंद्रप्पा नावाच्या मुलाची निवड केली. माहितीनुसार चंदप्पा BMTC मध्ये कंडक्टर आहे आणि तो सिंधूसोबत लग्न करण्याच तयार होता.

चंद्रप्पाला संपूर्ण घटनेची माहिती होती आणि त्याने सिंधूसोबत लग्नाची तयारी दाखवली. सिंधूनेही त्याला पसंद केल्याने लग्न समारंभास्थळीच दोघांनी लग्न केले. दरम्यान, चिकमगळूरमधील घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी सिंधू आणि चंद्रप्पा यांचे कौतुक केलं आहे. विशेष करुन सिंधूच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Groom Runs away from His Wedding while Bride Ties Knot with a Guest