esakal | देशाच्या गतीमान विकासासाठीचा कॉरिडॉर; PM मोदींच्या हस्ते लाँग हॉल कंटेनर ट्रेनचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

modi train

PM मोदींनी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन द्वारे चालणाऱ्या 1.5 किमी लांब अशा जगातील पहिल्या डबल स्टॅक लाँग हॉल कंटेनर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

देशाच्या गतीमान विकासासाठीचा कॉरिडॉर; PM मोदींच्या हस्ते लाँग हॉल कंटेनर ट्रेनचा शुभारंभ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे आज वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (Western Dedicated Freight Corridor-WDFC) च्या 306 किमी लांब रेवाडी-मदार खंडाचे लोकार्पण केले आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्शन द्वारे चालणाऱ्या 1.5 किमी लांब अशा जगातील पहिल्या डबल स्टॅक लाँग हॉल कंटेनर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, न्यू अटेली पासून न्यू किशनगढपर्यंत 1.5 किमीच्या लांब मालगाड्यांच्या शुभारंभासह आज भारत जगातील मोजक्या देशांच्या यादीत आपलं नाव नोंदवत आहे. आजच्या या दिवसाने NCR, हरियाणा आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी आणल्या आहेत. डेडिकेटड फ्रेट कॉरिडोर हा इस्टर्न असो वा वेस्टर्न, हा फक्त मालगाड्यांसाठी आधुनिक मार्ग नाहीये तर हा देशाच्या गतीमान विकासासाठीचा कॉरिडॉर आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली सुरु; प्रजासत्ताक दिनी सरकारवर दबाव आणण्याची रंगीत तालीम

गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेला गती
मोदींनी पुढे म्हटलं की, आधी रेल्वेमध्ये बुकींगपासून ते प्रवास संपेपर्यंत अनेक तक्रारी असायच्या. साफ-सफाई, ट्रेनची वेळ, सुविधा, सुरक्षा या मुद्यांवर रेल्वेमध्ये परिवर्तनाची मागणी व्हायची. गेल्या काही वर्षांमध्ये यातील बदलांना गती आली आहे. आज भारतात इन्फ्रास्ट्रक्चरचे काम 2 रुळांवर एकसाथ सुरु आहे. एक रुळ व्यक्तीच्या वैयक्तिक विकासास चालना देत आहे तर दुसऱ्या रुळावर देशाच्या विकासाच्या इंजिनास नवी उर्जा मिळत आहे. शेतकऱ्यांबाबत मोदींनी म्हटलं की, देशात इन्फ्रास्ट्रक्चरला आधुनिक बनवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना गती आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आधुनिक डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली गेली आहे. 

loading image