घर खरेदीसाठी 'अच्छे दिन', केंद्र सरकारचा दिलासा

वृत्तसंस्था
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

घर खरेदीसाठी अच्छे दिन आले असून केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेताना निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 वरून 05 टक्क्यांवर आणला आहे, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील 08 वरून एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये या दरकपातीबाबत निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली- घर खरेदीसाठी अच्छे दिन आले असून केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेताना निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 वरून 05 टक्क्यांवर आणला आहे, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील 08 वरून एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये या दरकपातीबाबत निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गृहखरेदीवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी हे बदल केले असून यामुळे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल आणि बांधकाम क्षेत्राला या कपातीचा मोठा फायदा मिळेल, असे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यावेळी सांगितले.

बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये 60 चौ. मीटर कार्पेट एरियापर्यंतची घरे परवडणारी मानली जातील तर नॉन मेट्रो शहरात 90 चौ. प्रति मीटरची घरे परवडणारी मानली जातील. या घरांची कमाल किंमत 45 लाख रुपये असेल. हे नवे दर 01 एप्रिल पासून लागू होतील अशी माहितीही जेटलींनी यावेळी दिली.

दरम्यान, बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅटवर सध्या 12 टक्के जीएसटी असला, तरी बांधकाम व्यावसायिकांना त्याचे इनपुट क्रेडिट मिळत असल्यामुळे प्रत्यक्षातील हा कर 05 ते 06 टक्केच पडतो. तथापि, बांधकाम व्यावसायिक इनपुट सवलत ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करीत नाहीत. त्यामुळे तो 5 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST for construction houses is 5 percent from 12