जीएसटीमुळे अनेक 'छुपे कर' बंद : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

जीएसटी प्रणाली ही 'खूप किचकट' प्रणाली आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, जीएसटीवर ज्याप्रकारे टीका केली जात आहे. ती टीका योग्य नाही, जीएसटी प्रणाली किचकट नाही. जीएसटीमुळे 'इन्स्पेक्टर राज' संपुष्टात आले.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होऊन आज एक वर्षपूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''जीएसटीमुळे अनेक 'छुपे कर' बंद झाले. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दरही कमी झाले आहेत''. तसेच विरोधकांकडून जीएसटी प्रणालीबाबत लावलेले आरोपही पंतप्रधान मोदींनी खोडून काढले. 

येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी जीएसटीवर भाष्य केले. ते म्हणाले, जीएसटी प्रणाली ही 'खूप किचकट' प्रणाली आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, जीएसटीवर ज्याप्रकारे टीका केली जात आहे. ती टीका योग्य नाही, जीएसटी प्रणाली किचकट नाही. जीएसटीमुळे 'इन्स्पेक्टर राज' संपुष्टात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   

तसेच ते पुढे म्हणाले, आपल्याकडे दूध आणि आलिशान मर्सिडिज कार एकाच किमतीला मिळते का? असा सवाल उपस्थित करत सर्वच वस्तूंना एकाच कर कक्षेत आणणे हे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: GST has removed a number of hidden taxes says PM Narendra Modi

टॅग्स