'जीएसटी'च्या कार्यक्रमात व्यासपीठावर नसतील मनमोहनसिंग!

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 30 जून रोजी जीएसटीच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - बहुचर्चित वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 30 जून रोजी जीएसटीच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित नसतील.

काँग्रेसच्या वतीने सत्यार्थ चतुर्वेदी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "30 जून रोजी जीएसटीसंदर्भात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हा कार्यक्रम म्हणजे समाजातील वास्तवाकडे, शेतकऱ्यांच्या विषयांकडे, सामाजिक विषमतेकडे दुर्लक्ष करण्याचा देखावा ठरणार आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ करापोटी, प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी नाही', असे चतुर्वेदी म्हणाले. तृणमूल काँग्रेसनेही जीएसटीवर टीका करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. याशिवाय डावे पक्ष, बहुजन पक्ष, समाजवादी पक्ष, तमिळनाडूतील डीएमके यांनीही या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Web Title: GST Manmohan Singh launching programme marathi news new delhi india news