esakal | महाराष्ट्रासह २३ राज्यांना जीएसटी भरपाई

बोलून बातमी शोधा

GST}

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसान भरपाईपोटी केंद्राने आज महाराष्ट्रासह २३ राज्यांना सुमारे ४००० कोटी रुपयांचा १८ वा हप्ता वितरित केला. जीएसटी परिषदेचे सदस्य असलेल्या नवी दिल्ली, जम्मू-काश्‍मीर व पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशांना ३२२ कोटींहून जास्त रक्कम आज देण्यात आली.

महाराष्ट्रासह २३ राज्यांना जीएसटी भरपाई
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

केंद्राकडून १८ व्या हप्त्यात चार हजार कोटी
नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसान भरपाईपोटी केंद्राने आज महाराष्ट्रासह २३ राज्यांना सुमारे ४००० कोटी रुपयांचा १८ वा हप्ता वितरित केला. जीएसटी परिषदेचे सदस्य असलेल्या नवी दिल्ली, जम्मू-काश्‍मीर व पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशांना ३२२ कोटींहून जास्त रक्कम आज देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीएसटी नुकसानभरपाईपोटी केंद्रातर्फे राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना साधारणतः दर आठवड्याला नुकसान भरपाई देण्यात येते. आज ३ हजार ६७७ कोटी रुपयांचा १८ वा हप्ता देण्यात आला. आतापावेतो राज्यांना जीएसटी नुकसान भरपाईच्या ९४ टक्के रक्कम देण्यात आल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. यापैकी राज्यांना ९५ हजार १३८ कोटी तर केंद्रशासित प्रदेशांना सुमारे ८ हजार ८६१ कोटी रुपये केंद्राकडून देण्यात आले आहेत.

प्रशांत किशोर आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार

जीएसटी संकलनात वाढ
फेब्रुवारीत १ लाख १३ हजार १४३ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. कोरोनातून सावरताना देशात सलग पाचव्या महिन्यात जीएसटीचे संकलन १ लाख कोटी रूपयांहून जास्त झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. जानेवारीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीत जीएसटी संकलनात ७ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. फेब्रुवारीत केंद्राच्या तिजोरीत जमा झालेल्या संकलनात केंद्रीय सीजीएसटी - २१,०९२ कोटी, राज्यांचा एसजीएसटी-२७,२७३कोटी, समन्वित आयजीएसटी -५५,२५३ कोटी (यातील २४,३८२ कोटींची वसुली इम्पोर्टेड सामानावरील) व उपकरापोटी ९५२५ कोटी रुपये अशी वर्गवारी असल्याचे सांगण्यात आले. 

आएशाचा शेवटचा कॉल होतोय व्हायरल; नवरा म्हणाला 'जीव देतानाचा व्हिडिओ पाठवून दे'!

काही राज्यांना देण्यात आलेला एकूण जीएसटी (आकडे कोटी रूपयांत) 

  • ११,९५४.०२ - महाराष्ट्र
  • १२,३८३ - कर्नाटक
  • ९२०४.३१ - गुजरात
  • ३४६८.३३ - पश्‍चिम बंगाल
  • ६२२९.०५ - तमिळनाडू
  • ५८५३.७६ - दिल्ली

Edited By - Prashant Patil