GST | 5 टक्क्यांचा टप्पा होणार रद्द? मोदी सरकार मोठे बदल करण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gst

GST | 5 टक्क्यांचा टप्पा होणार रद्द? मोदी सरकार करणार मोठे बदल

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : देशात वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी ) लागू होण्याला येत्या जुलैमध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकार यामध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाले तर यामुळे काही सेवा व वस्तुंचे दर वाढणार आहे.

मंत्रिगटाची लवकरच बैठक

सध्या जीएसटीचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे आहेत. यापैकी ५ टक्क्यांचा टप्पा रद्द करून तो १२ टक्क्यांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे समजते. सध्या असलेले GST दराचे चार टप्पे कमी करून तीनच टप्पे ठेवले जाणार असल्याचीही चर्चा आहे. यामुळे काही सेवा व वस्तुंचे दर वाढणार आहे. करप्रणालीत सुधारणा सुचविण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचा अहवाल काैन्सिलच्या आगामी बैठकीसमोर मांडला जाणार आहे. या अहवालाला अंतिम रूप देण्यासाठी या मंत्रिगटाची बैठक लवकरच होणार असल्याचे समजते.

हेही वाचा: समीर वानखेडेंच्या लग्नाचा निकाहनामा समोर, मलिकांचा बॉंम्ब

याचाच एक भाग म्हणून सरकारने १८ नोव्हेंबर रोजी एक अधिसूचना काढून तयार कपडे व पादत्राणांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के केला आहे. उर्वरित वस्तूंबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे राज्यांचे उत्पन्न होणार कमी होणार असल्याचेही बोललं जातयंजीएसटी लागू करताना त्यामुळे राज्यांना होणारा तोटा केंद्र सरकारने पाच वर्षांपर्यंत भरून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. येत्या जुलैपासून केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी तुटीची भरपाई बंद होणार असून, त्यामुळे राज्यांच्या उत्पन्नामध्ये मोठा खड्डा पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: कोनशिलेवर लिहलं होतं हसन 'मुस्त्रीफ'; अजितदादांनी लावला कपाळाला हात

loading image
go to top