Gujarat Election : राहुल गांधी यांच्या आज सूरत, राजकोटमध्ये सभा

गुजरातमध्ये प्रथमच प्रचार करणार
Rahul Gandhi congress propaganda Surat Rajkot
Rahul Gandhi congress propaganda Surat Rajkotsakal

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी (ता. २१) गुजरातमध्ये पहिल्यांदाच प्रचार करणार आहेत. भारत जोडो यात्रेचे २१ आणि २२ नोव्हेंबर हे विश्रांतीचे दिवस आहेत. त्यापार्श्वभूमीवर ते सुरत आणि राजकोट येथे राहुल यांच्या प्रचारसभा होतील.

गुजरातमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत (२०१७) काँग्रेसने ७७ जागा मिळवून भाजपला ९९ जागांवर रोखले होते. १९८५ नंतर काँग्रेसला प्रथमच एवढ्या जागा मिळाल्या होत्या. दक्षिण गुजरातमध्ये सुरत वगळता अन्य भागांत काँग्रेसची कामगिरी मागील निवडणुकीत चांगली झाली होती.

काँग्रेसने अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या २७ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १४ मतदारसंघ दक्षिण गुजरातमधील आहेत. त्याचप्रमाणे सौराष्ट्र भागातही काँग्रेसने २८ जागा जिंकल्या होत्या. असे असताना यंदाच्या निवडणूक प्रचारात राहुल सहभागी झाले नसल्यावरून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या सभा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

खर्गे आज मुख्यालयात

राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये व्यस्त असताना पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत मुक्काम ठेवला आहे. राजधानीत थांबून त्यांनी नेते, कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पक्ष मुख्यालयामध्ये भेटीगाठींचे नियोजन केले आहे. २४, अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात ते सोमवारी सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान संवाद साधतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com