762 कोटींच्या GST घोटाळ्याप्रकरणी 'माधव'च्या अध्यक्षाला अटक

Gujarat GST Scam
Gujarat GST Scamesakal
Summary

तपास यंत्रणा नीलेशचा बराच काळ शोध घेत होती.

जीएसटी (GST) फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात गुजरात एटीएसनं (Gujarat ATS) मोठी कारवाई केलीय. माधव कॉपर लिमिटेड (Madhav Copper Ltd.) या खासगी कंपनीचे अध्यक्ष नीलेश पटेल (Nilesh Patel) यांना 762 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. तपास यंत्रणा नीलेश पटेलचा बराच काळ शोध घेत होती. परंतु, तो फरार होता. जीएसटी विभागानं अफझल सिजाणी, महंमद अब्बास, रफिक अली यांना करचुकवेगिरी प्रकरणात आधीच अटक केली होती. मात्र, नीलेश फरार होता. नीलेशवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नीलेशनं आपल्या अटकेला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अर्जही केला होता; पण त्याला अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही.

इतकंच नाही तर अटक टाळण्यासाठी नीलेशनं 19 फेब्रुवारीला जीएसटी अधिकाऱ्यांवर गाडी चालवण्याचाही प्रयत्न केला होता. अधिकाऱ्यांना कारनं धडक देऊन तो पळून गेला. तेव्हापासून जीएसटी विभाग त्याचा शोध घेत होती. नीलेश अहमदाबादमध्ये लपल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. यानंतर एटीएसचं पथक तिथं पोहोचलं आणि नीलेशला अटक केली. या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसनं नीलेशला अहमदाबादमधील (Ahmedabad) जीएसटी विभागाकडं सोपवलंय.

Gujarat GST Scam
18 महिलांशी लग्न करणाऱ्या डॉक्टरच्या बहिणीलाही अटक

नीलेश 8 महिन्यांपासून होता फरार

नीलेश पटेल गेल्या 8 महिन्यांपासून फरार होता. बनावट जीएसटी बिलांच्या माध्यमातून त्यानं मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीनं आतापर्यंत नीलेश पटेलसह 15 जणांना अटक केलीय. याशिवाय आतापर्यंत सुमारे 500 कोटी रुपयांच्या कर फसवणुकीची कागदपत्रं समोर आली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात राज्य जीएसटीच्या वतीनं नीलेश पटेल याला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तो हजर राहिला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com