'त्या' महिलेने रिक्षा चालकाला दिली कोट्यवधींची संपत्ती, घर, दागिने; जाणून घ्या कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेने रिक्षा चालकाला दिली कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या कारण...

महिलेने रिक्षा चालकाला दिली कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या कारण...

भुवनेश्वर: ओदिशाच्या कटकमध्ये (Odisha cuttack) एका रिक्षावाल्याचं (Rickshaw puller) नशीब चांगलचं फळफळलं आहे. बुधा समळ (Budha Samal) असं या रिक्षा वाल्याचं नाव आहे. बुधा रिक्षा ओढण्याचं काम करतो. ओदिशात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने आपली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बुधाच्या नावावर केली आहे. मिनाती पटनाईक (६३) (Minati Patnaik) असं या महिलेचं नाव आहे. सुताहत येथे त्या रहायला आहेत. आपलं तीन मजली घर, सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तू त्यांनी बुधा समळला देऊन टाकल्या.

तुम्हाला प्रश्न पडला असेल, की वृद्ध महिलेने आपली कोट्यवधीची संपत्ती एका रिक्षावाल्याला का दिली? तर त्याचं उत्तर आहे सेवा. बुधा समळने गेली २५ वर्ष या महिलेची आणि तिच्या कुटुंबाची सेवा केली.

हेही वाचा: "..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

दोन दशकाहून अधिक काळ केलेल्या सेवेमुळे बुधाने मिनाती यांचा विश्वास संपादन केला. मिनाती यांच्या पतीचं मागच्यावर्षी किडनी फेल झाल्यामुळे निधन झालं. मिनाती मुलगी कोमल सोबत राहत होत्या. पण तिच सुद्धा कार्डिअक अरेस्टमुळे निधन झालं.

हेही वाचा: ''चंद्रगुप्त मौर्य यांनी केला सिकंदरचा पराभव'', मुख्यमंत्री योगींचा दावा

"पती आणि मुलीच्या निधनानंतर मी उद्धवस्त झाले होते. दु:खात होते. त्या कठीण काळात कुठल्याही नातेवाईकाने मला साथ दिली नाही. मी पूर्णपणे एकटी पडले होते. पण त्या कठीण काळात रिक्षाचालक बुधा आणि त्याचं कुटुंब खंबीरपणे माझ्या मागे उभं राहिलं. कुठलीही अपेक्षा न ठेवता माझ्या तब्येतीची काळजी घेतली" असे मिनाती पटनाईक यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. "माझ्या नातेवाईकांकडे बऱ्यापैकी संपत्ती आहे. मला माझी प्रॉपर्टी एखाद्या गरीबालाच द्यायची होती" असे मिनाती म्हणाल्या.

loading image
go to top