ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये पाहा काय केले जातेय?

Gujarat civic body builds wall to shut out slum on Donald Trump route
Gujarat civic body builds wall to shut out slum on Donald Trump route

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या मार्गात येणाऱ्या झोपड्या त्यांना दिसू नयेत म्हणून एक खास भिंत बांधण्याचे काम गुजरात मध्ये चालू आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

अहमदाबाद महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागात काही झोपड्या आहेत. त्या ट्रम्प यांना दिसू नयेत म्हणून ही भिंत उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महापालिकेने दिलेल्या कामानुसार तूर्तास अर्धा किलोमीटरची भिंत उभारली जाते आहे. या भिंतीची उंची सहा ते सात फूट असणार आहे. या सगळ्या प्रकाराबाबत अहमदाबाद महापालिकेच्या महापौरांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com