
गुजरातमधील सुरत शहरातील १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेलेल्या २३ वर्षीय गर्भवती शिक्षिकेला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. चार दिवसांनंतर पोलिसांना शिक्षिकेला अटक करण्यात यश आले. चौकशीदरम्यान महिला शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की, ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. हे मूल त्या १३ वर्षीय विद्यार्थ्याचे आहे. यामुळे ती विद्यार्थ्यासोबत पळून गेली. तर आता त्या मुलाचा डीएनए अहवाल समोर आला आहे. यातून एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे.