

Man Raped Six Year Old Minor Girl
ESakal
गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात निर्भया प्रकरणासारखीच एक घटना समोर आली आहे. ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात असमर्थ झालेल्या एका व्यक्तीने तिच्या गुप्तांगात रॉड घातला. नंतर घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १०० संशयितांची चौकशी केल्यानंतर आरोपीला अटक केली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला राजकोटमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.