Gujarat Election : भाजपची डोकेदुखी वाढली; बडोदा बनला बंडखोरांचा बालेकिल्ला

Amit Shah and Narendra Modi
Amit Shah and Narendra Modi
Updated on

अहमदाबाद - गुजरातच्या वाघोडिया मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपच्या तिकिटावर विजयी झालेले सहा वेळा आमदार राहिलेले मधुभाई श्रीवास्तव यांना भाजपने यावेळी तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Amit Shah and Narendra Modi
Maha Vikas Aghadi: वंचित बहुजन आघाडीशी युतीबाबत अजित पवार यांचं मोठं विधान म्हणाले..."

एज्युकेशन हब अशी गुजरातमधील बडोदाची ओळख आहे. मात्र गुजरात निवडणुकीत आता बंडखोरांचा बालेकिल्ला म्हणूनही त्याची ओळख होऊ लागली आहे. सहा वेळा आमदार राहिलेल्या मधुभाई श्रीवास्तव यांना यावेळी भाजपने तिकीट नाकारलं होतं. ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ते एक चित्रपट निर्माते देखील आहे आणि एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.

हेही वाचा Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

मधुभाईं म्हणाले की, मी बंडखोर झालो नाही. मला बोलावण्यात आलं होतं. मी १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. मी सर्वाधिक मतांनी विजयी झालो होतो. त्यानंतर भाजपनं मला फोन केला आणि पाच वेळा तिकीट दिलं. याच विधानसभा मतदारसंघातून मी पाच वेळा विजयी झालो आहे. यावेळी निवडणुकीचा निकाल 8 तारखेला येईल, बघा, यावेळी मला 1995 मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मतं मिळतील, असंही ते म्हणाले.

Amit Shah and Narendra Modi
Disha Salian Death: "दिशा सलियन केसमध्ये सीबीआयचा दोष नाही.." नितेश राणेंनी महाविकास आघाडीला धरले धारेवर

मधुभाई पुढं म्हणाले, अपक्ष निवडणूक जिंकून मी भाजपला पाठिंबा दिला. वाघोडियामध्ये भाजपचा जन्म झाला नव्हता, मीच निवडणूक जिंकून भाजपला बडोदा शहरात आणल्याचा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com