
प्रशांत किशोर यांच्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये मतभेद, पक्षाचे नेते नाराज
अहमदाबाद : गुजरात निवडणुकीपूर्वीच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसबरोबर काम करणार का ? यावरुन प्रदेश काँग्रेसमध्ये पूर्णपणे संभ्रमाची स्थिती आहे. अनेक नेत्यांचे म्हणणे आहे, की पक्ष पूर्वीपासूनच ग्रामीण भागात मजबूत आहे आणि प्रशांत किशोर (Prashant Kishor) शहरी भागांमध्ये जास्त फरक करु शकत नाही. कारण तेथील जनता ही भाजपची पारंपरिक मतदार आहे. हायकमांडला याबाबत संदेश पाठवले आहे, की कोणताही निर्णय घेण्यास उशीर झाल्यास पक्षाची रणनीती प्रभावित होऊ शकते. वृत्तानुसार, किशोर नोव्हेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या गुजरात निवडणुकीऐवजी (Gujarat Elections) काँग्रेसबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठी संधी शोधत आहेत. (Gujarat Elections Congress Leaders Confuse Over Prashant Kishor Role)
हेही वाचा: देवेंद्र फडणवीस आहेत उद्याचे मुख्यमंत्री, रामदास आठवले यांची भविष्यवाणी
दुसरीकडे गुजरात काँग्रेसचे (Congress Party) एक वरिष्ठ सदस्य म्हणाले, की किशोर यांनी पक्षासाठी काम करावे की नाही या वरुन ५० : ५० असे विभागणी झाली आहे. काँग्रेसने २०१७ मध्ये भाजपला जबरदस्त टक्कर दिली. १८२ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत सत्ताधारी पक्षाला दोन अंकीपर्यंत मर्यादित केले. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसचे अनेक आमदारांनी दल बदल केला आहे.
गुजरातमध्ये काँग्रेससाठी फार मोठा बदल पीके करु शकणार नाहीत
गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, की किशोर गुजरातमध्ये काँग्रेससाठी फार मोठा फरक घडून आणू शकत नाहीत. ग्रामीण भागात काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे. दुसरीकडे नेत्यांनाही माहित आहे, की शहरी भागात भाजपला हरवणे अवघड आहे. मग प्रशांत किशोर यांना आणण्यासाठी इतका खर्च कशाला? त्यामुळे प्रचार आणि इतर कामे उमेदवारांना द्यायला हवी. यामुळे पक्षाला जास्त फायदा होईल.
हेही वाचा: दंगली होतायत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत : दिग्विजय सिंह
पीकेमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल
प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार पक्षाच्या अनेक नेत्यांनी जोर देऊन सांगितले आहे, की किशोर यांच्याबाबत लवकरात-लवकर निर्णय घ्यायाल हवा. पक्षाचा एक गट किशोर यांचे समर्थन करतो. ते म्हणतात, पीके आल्यास आम्ही जिंकू शकू. या प्रमाणे कार्यकर्त्यांचा आशावाद वाढत आहे. निर्णय घेण्यास उशीर झाल्यास काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचेल.
Web Title: Gujarat Elections Congress Leaders Confuse Over Prashant Kishor Role
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..